धर्माबाद (प्रतिनिधि)
धर्माबाद शहरातील विविध ठिकाणी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळच्या सत्रामध्ये डॉ. अण्णा भाऊ साठे चौका पासून मोटर सायकल रॅली रामनगर, साठेनगर, रत्नाळी, इंदिरा नगर व अण्णा भाऊ साठे चौक येथे शांततेत समाप्त करण्यात आले.व्ही
जी. डोईवाड, बी. एम. गोणारकर, राजेश मनुरे, गी. आर. गोणारकर, लक्ष्मण निदानकर, सत्यनाराय पवळे, बाबू गोणारकर,एल. एल. निदानकर,या सर्वांनी रॅलीचे नेतृत्व केले. दुपारच्या सत्रामध्ये रत्नाळी, रामनगर, साठे नगर येथे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले.तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रा. रवींद्र पाटील चव्हाण रत्नाळी येथे मनोगत वेक्त करतांना असे आश्वासन दिले की खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या माध्यमातून रत्नाळी येथे डॉ. अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह लवकरच उभारण्याचे पर्यंत करणार. असे रत्नाळी जयंती मंडळाला आश्वासन दिले आहे.प्रा. रवींद्र पाटील चव्हाणसह वैभव कुलकर्णी, नरेंद्र रेड्डी,दिगांबर लखमावाड,निलेश पा.शिवराज गाडीवान, व्ही. जी. डोईवाड, बाळापूरकर,फुलाजी पा. हारेगावकर,राजु पाटील,हणमंत पा. नरवाडे,बालाजी पा. कारेगावकर,माधव पा. चोंडीकर, अशोक पुजरवाड, संजय पवार, नरेश रेड्डी, किरण पाटील बेंद्रे, भुजंग पा.,विठ्ठल कोंडलवाडे,साई पा. बन्नाळीकर, नागनाथ जिंकले, लक्ष्मण निदानकर, श्रीकांत उल्लेवाड,साई पा. मोकलीकर,आकाश पा. ढगे या सर्वांचे रत्नाळी जयंती मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले.
संध्याकाळच्या सत्रामध्ये रत्नाळी, बाळापूर, राम नगर साठे नगरासह सर्व जयंती मंडळानी भव्य मिरवणूक संध्याकाळी चार वाजता मिरवणूक मुख्य रस्त्याने निघाली, रात्री दहा वाजता शांततेत संपन्न झाली.
रत्नाळी जयंती मंडळाचे अध्यक्ष सुनील गोणारकर, चंद्रकांत गोणारकर,श्रीकांत गोणारकर,अनिल गोणारकर, पुंडलिक गोणारकर, राजकुमार गायकवाड, विशाल इबितवार, विजय गोणारकर सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या आदेशाने गुप्त संचार विभागाचे भालेराव, संतोष अनेराव,यांच्यासह मोठा फोजफाटा ठेवण्यात आला होता .
चौकट
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, पोलीस स्टेशन, नगरपरिषद, यशवंत विद्यालय तहसीलदार कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच मिरवणूकमध्ये दत्तकृपा इरिगेशनचे मालक साईनाथ पाटील कदम यांच्या वतीने खिचडी व पाणी वाटपा करण्यात आले.डॉ. अण्णा भाऊ साठे चौकात येथे शिवा सहदेव यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले. इंदिरा नगर येथे गिरीश मांजरमकर यांच्या वतीने खिचडी तर नागनाथ गोणारकर यांच्या वतीने खीर वाटप करण्यात आले.तसेच रत्नाळीचे सामाजिक कार्यकर्ते कै.दत्ताहरी विठ्ठल गोणारकर त्यांची उणीवा भासत होती.