धर्माबाद (वार्ताहर) मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक तथा धर्माबाद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जी. पी. मिसाळे सर यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या 70 वृक्षांचे विविध ठिकाणी वृक्षारोपण करून तसेच जिल्हा परिषद बाभळी येथील गरीब विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.
शासनाकडून वेळोवेळी वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात येत आहे. घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या आई-वडिलांच्या नावे अथवा कोणतेही औचित्य साधून किमान एक वृक्ष तरी लावावे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत होईल. या शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत आपला वाढदिवस 70 वृक्ष लावून साजरा करण्याचा निर्धार येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जी. पी. मिसाळे यांनी करून फुलेनगर येथील बौद्ध स्मशानभूमी, बुद्ध टेकडी, तसेच बाभळी, बाभुळगाव अशा विविध ठिकाणी पिंपळ, जांभूळ, चिंच, वड, सागवान इत्यादी प्रकारच्या रोपट्यांचे वृक्षारोपण केले.
यावेळी सौ. भारतबाई मिसाळे यांच्यासह फुलेनगर चे ज्येष्ठ नागरिक जी. बी. वाघमारे, बाबुराव वाघमारे, के. एम. हनमंते, आनंदा सोनटक्के, रोहिदास कांबळे, पत्रकार बाबुराव पाटील, गंगाधर धडेकर, सुदर्शन वाघमारे, माधव हनमंते, सौ. मीना भद्रे, धनंजय गायकवाड, बी.पी. कुदाळे, लक्ष्मण तुरेराव, किशन कांबळे, गणेश वाघमारे, नागनाथ माळगे, भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष शिवराज गायकवाड, शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते ताहेर पठाण, सी. एन. वाघमारे, लक्ष्मण पाटील येताळे, माजी नगरसेवक संजय पवार, किशन बेलूरकर, व्यंकटराव एडके, राष्ट्रवादीचे मोहम्मद जावेद, पत्रकार बाबुराव गोणारकर, गजानन कुरुंदे, गंगाधर हनमंते, राहुल भुतनरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.