धर्माबाद : शहरातील विनोदकुमार बोईनवाड हे अवैध सावकारीचा व्यवसाय करुन गोरगरीब नागरिकांची लुट करत असल्याची वस्तुनिष्ठ तक्रार तालुक्यातील माष्टी येथील सोपान कदम व इतर दोघांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांचेकडे दि. 20 मे रोजी केली होती. या प्रकरणी दि. 2 आँगस्ट रोजी थातूरमातूर चौकशी करुन बोईनवाड यास मोकळे सोडल्याने सहायक निबंधकांनी केलेल्या चौकशीवरच प्रश्नचिन्ह तर उपस्थित करण्यात येतच आहेत पण चौकशी अधिकाऱ्यांच्या विश्वाहर्तेवरच शंका व्यक्त करण्यात येत आहे.
धर्माबाद शहरातील विनोदकुमार बोईनवाड हे अवैध सावकारीचा व्यवसाय करुन अव्वाच्या सव्वा व्याज आकारुन गोरगरीब व लाहान सहान व्यापाऱ्यांची लुट करतात हे संपूर्ण धर्माबाद शहराला माहीत असताना चौकशीत काहीच सापडले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सहकार विभाग अतिशय भ्रष्ट विभाग म्हणून सर्वत्र परिचित असून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली विश्वाहर्ता रहावी कधीच प्रयत्न करत नसतात. पैसे घेवून काहीही करतात असा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास असून धर्माबाद शहरातील अवैध सावकारी प्रकरणातही सहकार विभागाच्या चौकशी करणाऱ्या धर्माबादच्या सहायक निबंधकांने आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे.
अवैध सावकारी प्रकरणी धर्माबाद सहायक निबंधकांनी दि. 2 आँगस्ट रोजी केलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना दि. 5 आँगस्ट रोजी सादर केला. तर तक्रारीच्या दोन महिण्यानंतर चौकशी केली. सहकार विभागाचा हा कारभार पाहता अवैध सावकारीच्या माध्यमातून जनतेची लुट करणाऱ्या बोइनवाड यास वाचवण्याचा प्रयत्न दिसून येतो. जिल्हा उपनिबंधकांना पाठवलेल्या आहवालात दि. 2 आँगस्ट रोजी विनोदकुमार बोईनवाड यास नोटीस देवून तक्रारीच्या अनुषंगाने अवैध सावकारी संबधात असणारे रेकार्ड, दस्तऐवज, तारण मालमत्ता, चौकशी अधिकाऱ्याकडे सादर करण्याचे आदेश दिल्याचे नमुद केले. बोईनवाड यांनी वेळेत कोणतेच कागदपत्रे सादर केली नसल्याने दुसरी नोटीस तामिल करुन घराची झडती घेण्यात आली. यावेळी कोणतेही दस्तऐवज सापडले नसल्याने ते अवैध सावकारी करत नसल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल सादर केला.
चौकशी व कारवाईचा गाजावाजा करुन सावकाराकडे गेल्याने तो रेकार्ड सापडू देणार आहे का पण सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ तक्रारीची चौकशी करण्याचे सोपस्कार पुर्ण केले. या प्रकरणात सहकार विभागाचे अधिकारी अवैध सावकारी करणाऱ्या विनोदकुमार बोईनवाड यांच्याशी अर्थिक तडजोडी करुन मोकळे सोडल्याचा आरोप करण्यात येत असून तक्रारदार न्यायालयात दाद मागणार आहेत.