भिवंडी प्रतिनिधी
मिलिंद जाधव
भिवंडी तालुक्यातील पडघा समतानगर ,बोरीवली येथिल सेवानिवृत्त शिक्षिका दिवंगत ललिता लक्ष्मण दोंदे यांच्या प्रथम स्मृतिदिन दोंदे परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रक्रमांनी आईला अनोखी आदरांजली वाहण्यात आली.
ललिता लक्ष्मण दोंदे मेमोरियल फाऊंडेशन
(प्रस्तावित) यांच्या वतीने पडघा जिल्हा परिषद मराठी शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आला. शिबिराचे उद्घाटन बोरिवली ग्रामपंचायत प्रभारी सरपंच फरहान सुसे, पडघा डॉक्टर असो. अध्यक्ष डॉ. संजय पाटील, बोरिवली ग्रा. प. सदस्या आश्विनी कशिवले, डॉ. अशोक धवस, डॉ. अशोक भांगरे ,निवृत्त पी. एस.आय उमाकांत दोंदे, सामाजिक कार्यकर्ते जिवन दोंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर डॉ. सिध्दांत संजय दोंदे, डॉ. सृष्टी किशोर गायकवाड, डॉ. आस्था शैलेश दोंदे यांनी पडघा विभागातील नागरिकांची मोफत तपासणी केली. शैलेश दोंदे, संजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य शिबिर पार पाडण्यात आला.
त्यांच्या पश्चात दोन मुले आणि तीन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षिका ललिता लक्ष्मण दोंदे सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते शैलेश दोंदे, संजय दोंदे यांच्या मातोश्री होत्या.
सेवानिवृत्त शिक्षिका दिवंगत ललिता लक्ष्मण दोंदे यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, डॉ. सुभाष दोंदे,
सुषमाताई बसवंत, धम्मदीप बुध्दिस्ट कल्चरल संस्थेचे अध्यक्ष अशोक दुधसागरे, माजी निवृत्त अधिकारी नारायन भालेराव, माजी क्रीडा अधिकारी प्रदीप ढोके,प्रा. शरद ताजणे
अँड. धम्म किरण चन्ने, संजय इधे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड ,संजय गायकवाड ,प्रा. किशोर गायकवाड तर विविध क्षेत्रातील नागरिकांनी समतानगर पडघा, बोरीवली येथे अभिवादनासाठी हजेरी लावली होती. यावेळी अनाथ आश्रमातील मुलांचा संगोपन करणाऱ्या सुनंदा पवार यांना दहा हजार रुपयांचा तर आदरणिय भंत्ते मेंत्तो यांना पंधरा हजार रुपयांचा चेक सामाजिक बांधीलकी म्हणून दोंदे परिवाराच्या वतीने धम्मदान म्हणून देण्यात आले.तर शहापूर धम्मदीप बुध्दिस्ट कल्चरल संस्थेला पन्नास हजार रूपयांचे धम्मदान दोंदे परिवाराच्या वतीने जाहीर करण्यात आले. तर आदर्श शिक्षिका दिवंगत ललिता दोंदे यांच्या जीवनावर “माणुसकी फुळवणारी आई” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आंबेडकरी आंबेडकरी जेष्ठ साहित्यिका प्रा.अशालता कांबळे यांनी “आंबेडकरी आई” ही संकल्पना घेऊन आंबेडकरी आई कशी असते. याबाबत प्रबोधनाची ज्योत पेटवली आहे. त्याची सुरूवात त्यांनी पडघा समतानगर, बोरिवली येथून केली आहे.
शीलाला आणि शिक्षणाला महत्त्व देणारी आमची आई आहे. मुलीला समान पद्धतीने वागवणारी आई आहे. न्यूनगंडावर मात करणारी आमची आई आहे. आई संविधान मूल्यांची संस्कृती मांडणारी असायला पाहीजे. आणि घरामध्ये संविधान मूल्यांची संस्कृती रुजविणारी आई हवी. असे सांगत “आंबेडकरी आई” या विषयावरती आंबेडकरी जेष्ठ साहित्यिका प्रा.अशालता कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी दिवंगत ललिता दोंदे यांच्या कार्यावर अनेक नागरीकांनी मनोगत व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम नुसता स्मृतिदिन न राहता सामाजिक परिषदेचे स्वरूप आले होते.
अभिवादन सभेचे सूत्रसंचालन सुरेखा पैठणे यांनी केले. तर आभार सामाजिक कार्यकर्ते शैलेश दोंदे यांनी मानले.