येवला : पारेगाव येथील सर्वसाधारण कुटूंबातील गणेश खळे यांनी स्वतःच्या मुलीचा वाढदिवसाचा खर्च शाळेतील गोर गरिब निराधार गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य मिठाई वाटप करून राजनंदिनी हिचा प्रथम वाढदिवस साजरा केला.
यावेळी गणेश खळे म्हणाले कि माझे आई वडील अशिक्षित आहेत मला देखील परिस्थिती मुळे ज्यास्त शिक्षण घेता आले नाही परंतु मला पहीली मुलगी झाली ती शिकली पाहीजे मोठी अधिकारी बनली पाहीजे तिच्या वाढदिवसानिमित्त मी जो उपक्रम राबवला असा आदर्श इतर पालकांनी देखील घेऊन मुलीना शिक्षणासाठी मदत केली पाहीजे व मुलीचा सन्मान केला पाहीजे म्हणून मी अशा पद्धतीचे वाढदिवस साजरा केला आहे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिनभाऊ आहेर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे विजय घोडेराव वैशाली कुमावत सरपंच याच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला.यावेळेस मार्गदर्शन करताना महेंद्र पगारे म्हणाले कि एकीकडे मुलगी जन्माला आली म्हणून अनेक महीलाना शारीरिक मानसिक त्रास दिला जातो परंतु मला आज खुप आनंद वाटतो कि खळे परिवाराने मुलीचा वाढदिवस शालेय साहित्य व मिठाई वाटप करून शाळेत साजरा करून नवीन आदर्श निर्माण केला एकीकडे पुढारी नेते कार्यकर्ते याच्या वाढदिवसानिमित्त भरमसाठ अनाठायी खर्च केला जातो परंतु गोर गरिब गरजू निराधार मुलांवर कोणी खर्च किंवा मदत करत नाही म्हणून मी खळे परिवाराचे मनापासून आभार मानतो व राजनंदिनी ला मनापासून शुभेच्छा देऊन ती उद्याची एक आदर्श मुलगी म्हणून पारेगाव चे नाव रोशन करील असे गौरउदगार महेंद्र पगारे यांनी बोलताना व्यक्त केले.यावेळेस नंदु जाधव, हिरालाल खळे, दामु माळी, राजु माळी, नामदेव माळी, सागर पवार, शिवनाथ माळी, योगेश खळे, सौ. रमाबाई खळे, सौ.वर्षा खळे यांच्यासह गावातील अनेक महीला पुरुष शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.