धर्माबाद (तालुका प्रतिनिधि) धर्माबाद तालुक्यातील एकूण 27 आपले सरकार सेवा केंद्र चालकाची बैठक दिनांक 28/9/2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक संपन्न झाली असून या बैठकीत सर्वानुमते संघटनेची स्थापना झाली.या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गिरमाजी सूर्यकार आणि सचिव पदी विनोद पाटील जोगदंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, नुकतीच राज्यस्तरीय आपल्या सरकार सेवा केंद्र संघटनेची स्थापना झाली असून अधिकृत नोंदणी सुद्धा झाली आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्याला आणि तालुक्याला संघटनाची स्थापना करावयाची असल्याने त्या अनुषंगाने धर्माबाद तालुक्यातील सर्व केंद्र चालकाची बैठक घेऊन या बैठकीमध्ये संघटनेबाबत ध्येय धोरणे, संघटनेची कार्य व संघटनेचे महत्त्व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेच्या अंती सर्वानुमते सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
आपले सरकार सेवा केंद्र हे जनतेच्या सेवांसाठी अविरतपणे काम करत असून नागरिकांना शासनाच्या विविध सोयी सुविधा पुरवल्या जातात. त्याच प्रकारे केंद्र चालकाच्या प्रत्येक अडी अडचणी व त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना कायम सज्ज राहील असे यावेळी अध्यक्षांनी सांगितले.
संघटनेचे कार्यकारणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष: गिरमाजी सूर्यकार, उपाध्यक्ष:(ग्रामीण )साईनाथ पंजेवाड ( शहरी): गोपाल रेड्डी कोटावाड, सचिव: विनोद जोगदंड, कोषाध्यक्ष: शिवराज पाटील चोळाखेकर , सहसचिव: सय्यद रउफ, संघटक: साईनाथ पाटील कोदळे, सदस्य: हणमंत सुवर्णकार, सदस्य, सुरेश बनसोडे.
या संघटनेच्या निवडीमुळे नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा मिळतील या अपेक्षेने जनतेतून कौतुक केली जात आहे.