धर्माबाद(प्रतिनिधी) राष्ट्रीय उर्दू अभ्यासक कर्मचारी संघ यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातुन 100 शिक्षकांची दरवर्षी निवड होत असते . या वर्षीही त्यांच्या वतीने गालिब अकादमी , दिल्ली येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार वितरण सोहळयात देशभरातील १०० शिक्षकांना सन्मानित करण्यात आले . कौमी कर्मचारी उर्दू शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी वसिल अली गुर्जर, राष्ट्रीय उपाध्यक्ष मेहताब सर , राज्यअध्यक्ष आबिद खान , राज्य उपाध्यक्ष महामहिम जैनुल आबिदीन , शेख खलील ताहिर आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व उर्दू प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील उर्दू प्राथमिक शाळेतील नामवंत शिक्षक हाश्मी सय्यद अब्दुल साजिद सय्यद अब्दुल वहिद यांचा समावेश आहे . हाश्मी साजिद सर हे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी नेहमी अग्रेसर असतात .
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा ते नेहमीच सक्रिय असतात . त्यांचे अनेक लेख सुद्धा प्रकाशित झाले आहेत.आपल्या निर्भीड लेखनशैली आणि कार्यशैलीसाठी ते सुप्रसिद्ध आहेत . या पूर्वी सुद्धा त्यांना राज्यस्तरीय ज्ञानभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले ।होते .आता राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर त्यांच्यावर शैक्षणिक ,सामाजिक वर्तुळातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .