धर्माबाद प्रतिनिधी :- नांदेड येथे नुकतेच राज्यस्तरीय हॉकीच्या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत राजाराम काकांनी सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी 17 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर राज्य निवड समिती आयोजित निवड चाचणीत आर के एस व्ही एम या शाळेतील सोनाक्षी गिरी हिचे 17 वर्षाखालील मुलींच्या संघात निवड करण्यात आली.
दिनांक 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान हरियाणा येथील रोहतक येथे संपन्न होणारे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सोनाक्षी महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करणार आहे. सोनाक्षीच्या निवडीसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक तथा हॉकी प्रशिक्षक श्रीनिवास कांबळे यांनी परिश्रम घेतले तर सोलापूरचे क्रीडा अधिकारी श्री कुरेशी सर, क्रीडा प्रबोधनी पूनेचे सागर करांदे, सोलापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रुत पवार सर, नांदेड चे श्री सरदार हरविंदर सिंग कपूर आणि सचिन कांबळे या अधिकाऱ्यांनी सोनाक्षीचे निवड केली. सोनाक्षीचे निवड झाल्याबद्दल शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुबोध काकांनी यांनी शाळेच्या क्रीडा अनुकूल धोरण व विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनामुळे हे यश प्राप्त झाले आहे असे म्हटले, सोनाक्षी गिरी चे अभिनंदन करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिले तसेच शाळेतील प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक पालकांकडूनही कौतुक होत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी महाराज यांची मुलगी आहे.
सोनाक्षी गिरी सध्या जळगाव येथे प्रशिक्षण घेत असून तिला देण्यात आलेल्या प्रोत्साहनाबद्दल तिने शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुबोध काकानी, क्रीडा शिक्षक श्रीनिवास कांबळे, प्राचार्य व सर्व शिक्षकांचे व पालकांचे आभार मानले.