धर्माबाद (वार्ताहर) महावितरण विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी यादवराव मरीबा वाघमारे (वय ७५ वर्षे) रा. रसिक नगर धर्माबाद यांचं दिनांक ३०-११-२०२४ रोज शनिवारी सायंकाळी ठिक ५.५५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी दिनांक १-१२-२०२४ रोज रविवारी सकाळी ११ वाजता रत्नाळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, २ मुले, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नांदेड येथील लॉ कॉलेज चे संजय वाघमारे व महावितरण कर्मचारी सुहास वाघमारे यांचे वडील होत.