धर्माबाद प्रतिनिधी -धर्माबाद-89 नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षाच्या काळात भूतो ना भविष्याती अशा प्रकारची भरपूर विकास कामे केलेली आहेत. सर्वसामान्य लोकांना हे वृद्धांना देवदर्शन घडून आणले तसेच गोरगरीब लोकांना दवाखान्याच्या उपचारासाठी भरपूर आर्थिक मदत केली आहे. त्याचीच पावती म्हणून मतदार संघातील मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले आहे म्हणून 89 नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींची मनापासून इच्छा आहे की नांदेड जिल्हा करत आहे सक्षम पालक मंत्री तथा मंत्री म्हणून आमदार श्री राज्याची संभाजी पवार साहेबांची निवड करण्यात यावीनायगाव विधानसभेचे आजवरचे सर्वात कृतिशील ठरलेलं आमदार राजेश पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणे अगदी योग्यच असून तशा प्रकारची मागणी माजी उमेदवार जि.प.येताळा गट, माजी सरपंच आलुर,नेरळी, तथा धर्माबाद तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष तथा नांदेड केसरी साप्ताहिक चे मुख्य संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पाटील आलुरकर यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे ई-मेल द्वारे एका लेखी निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली आहे. उपरोक्त निवेदनात नमूद करताना त्यांनी आमदार राजेश पवार यांच्या कार्याची पोचपावती देत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली असून विधानसभेच्या अधिवेशनात अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी ही त्यांची नायगाव विधानसभा मतदारसंघच नाही तर महाराष्ट्राच्या समस्यांची तळमळ असल्याचे नमूद करते. तर अखंडितपणे नायगाव विधानसभेचा प्रत्येक गावचा दौरा त्यांनी गेल्या पाच वर्षात कित्येक वेळेस करत गावच्या समस्या व त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना याविषयी लक्ष देत थेट जनतेशी नाळ अतुट अशी जुळवून घेतली. त्यांनी देव देश आणि धर्म ही संकल्पना साक्षात उतरवत आपल्या मतदारसंघातील लोकांची मने जिंकली कुठलेच जातीपातीचे राजकारण त्यांच्याकडे नसल्याचे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले असून फक्त मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे त्यांचे ध्येय व ध्यास आहे हे आता सर्वांनाच पटले आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर त्यांच्यातली अभ्यासपूर्वक धमक बघून व आगामी होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना मंत्रिपद देणे योग्यच असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पाटील आलुरकर यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे ई-मेल द्वारे लेखी निवेदन पोहोचवत आमदार राजेश पवार हे यांना मंत्रिपद मिळावेच अशी रास्त मागणी केली.