नाशिक/ येवला:दि. १०/१२/२०२४ रोजी परभणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा तसेच भारतीय राज्य घटनेच्या प्रतिकृती वर एका माथेफिरू ने सामाजिक भावना भडकवण्याच्या उद्देशाने दगड फेकून पुतळा तसेच प्रतिकृती संविधानाचे पुस्तकाची विटंबना केली.म्हणून येवला येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सदरच्या घटनेचा जाहीर निषेध करत व्यक्त केला. सदरच्या घटनेमुळे सामाजिक तेढ निर्माण झाले आहे. त्यामुळे संविधान प्रेमी व आंबेडकरी समाजातील जनतेच्या भावना ह्या प्रचंड दुखावल्या गेल्या अशा घटना शिवराय फुले शाहु आंबेडकराच्या महाराष्ट्रात पुन्हा घडू नये म्हणून आरोपीस कडक कारवाई करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे याच्या नेतृत्वाखाली वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत अशा प्रकारचे लेखी निवेदन येवला तहसीलदार श्री.आबा महाजन यांना देण्यात आले. सदर निवेदनावर महेंद्रभाऊ पगारे(स्वारीप तालुकाध्यक्ष),विजयभाऊ घोडेराव (ता.कार्याध्यक्ष),सुरेश खळे(जेष्ठ नेते) बाळासाहेब, सोनवणे(ता.सरचिटणीस),आशाताई आहेर (तालुकाध्यक्ष महीला आघाडी),सागर हिरे, गौतम चव्हाण, दिपक वाघ, सारिक शेख, नितीन संसारे, संदिप खळे, रणजित संसारे आदींच्या सह्या निवेदनावर आहे.