धर्माबाद प्रतिनिधी धर्माबाद तालुक्यातील मौजे आलुर येथे श्री गणेश पुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा ,अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण , श्री गणेश पुराण कथाकार ह.भ.प. जयंत महाराज नांदेडकर संभाजीनगर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये सप्ताह सोहळा संपन्न. दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे करण्यात आले होते. 20 /12 /2024 रोज शुक्रवार ते 27/ 12 /2024 रोज शुक्रवार पर्यंत आयोजित करण्यात आलेले सप्ताह सोहळा संपन्न . दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे करण्यात आले होते पहाटे चार ते सहा काकडा आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण सकाळी सात ते दहा गाथा भजन साडेदहा ते अकरा श्री गणेश पुराण कथा दुपारी 12 ते साडेचार पर्यंत सायंकाळी साडेपाच ते सात पर्यंत हरिपाठ रात्री साडेआठ ते साडेदहापर्यंत किर्तन तथा 20/12/2024 रोजी किर्तनकार महाराज ह.भ.प. विकास महाराज धसवाडीकर, 21/12/2024 रोजी किर्तनकार महाराज ह.भ.प.मोहनराव कावडे गुरुजी हासनाळीकर, 22/12/2024 रोजी कीर्तनकार महाराज ह.भ.प. कृष्णा महाराज राजूरकर, 23/12/2024 रोजी किर्तनकार महाराज ह.भ.प.अजय पांडे महाज नाळेश्वर,24/12/2024 रोजी किर्तनकार महाराज ह.भ.प. माधव गुरुजी वडगावे पांगरीकर, 25/12/2024 रोजी किर्तनकार महाराज ह.भ.प. प्रतीक्षाताई निवलीकर, 26/12/2024 रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज मंडगीकर, 27/12/2024 रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज मंडगीकर यांचे काल्याचे किर्तन , इत्यादी कीर्तनकार महाराज यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताह सोहळा संपन्न . गायनाचार्य : श्री बंडू गुरुजी पांगरीकर, श्री जीवन पाटील रत्नाळीकर ,श्री विठ्ठल पाटील जवळा. काकडा /भजन : श्री गंगाधर महाराज बोरगाव, श्री मनोहर मामा शिंगनगावकर, श्री विठ्ठल महाराज समराळा, श्री नारायण महाराज बोधडी,मृदाचार्य: श्री माधव गुरुजी वडगावे, श्री लक्ष्मण महाराज तळेगाव, श्री विकास महाराज भावडे, श्री गणेश महाराज पाटोदा, श्री जनार्दन महाराज पाटोदा, वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी आलूरकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते . काल सप्ताह सोहळा समाप्ती करण्यात आले.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांची सुध्दा उपस्थिती होती. समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. आलेल्या सर्व भजन मंडळी, किर्तनकार महाराज, गायनाचार्य, काकडा भजन मंडळी, मृदाचार्य, माजी नगरसेवक,पत्रकार बांधव, यांचें समस्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आले होते.