बार्टी महासंचालक धम्मज्योति गजभिये यांचे प्रतिपादन
पुणे :- दि. ३१ जानेवारी (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजाच्या व्यथा, वेदना, मांडण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी मूकनायक हे पाक्षिक सुरु केले. मुकनायकने समाजाला जागे केले. प्रकाशन व प्रसिद्धी विभागाने मुकनायक चे अंक बार्टी फेसबुक पेजवर प्रसिद्ध करून त्याची प्रसिद्धी करावी. मूकनायकचा अभ्यास व तसेच बार्टीच्या योजना व विविध उपक्रम तळागाळातील जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी समतादूत मासिक सुरु करावे. असे प्रतिपादन बार्टी संस्थेचे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे मंगळवार दि. ३१/१/२०२३ रोजी मूकनायक या पाक्षिकाचा १०३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रीमती नंदिनी आवडे, विभागप्रमुख. श्रीमती स्नेहल भोसले, विभाग प्रमुख. श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक, कार्यालय अधीक्षक रितेश गोंडाणे, सुभेदार सचिन जगदाळे, श्रीमती संध्या नारखेडे, अॅड. प्रियदर्शनी तेलंग, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेम हनवते, डॉ. सारिका थोरात, शुभांगी सुतार, महेश गवई, स.प्र. व्यवस्थापक नसरीन तांबोळी, सुनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.
सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक संभाजी बिरांजे, डॉ. अंकुश गायकवाड, नरेश गोटे, यांनी मूकनायक वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामदास लोखंडे यांनी केले. आभार डॉ. प्रेम हनवते यांनी मानले..
छायाचित्रण :- राहुल कवडे