बुलढाणा प्रतीनीधी रघुनाथ गवई
बोराळा ता मालेगाव जी वाशीम येथील ग्राम पं चे उपसरपंच तथा वंचित बहुजन आघाडीचे जउलका सर्कल चे पदाधिकारी विश्वास कांबळे ह्यांचा दिनांक 18 फेब्रुवारी रोजी खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे* *त्यांच्या निकटवर्तीय कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे विश्वास कांबळे हे किन्हिराजा येथे आठवडी बाजारासाठी गेलेले होते कीन्हीराजा येथे बसस्टँड परिसरात असताना दुपारी चार ते पाच वाजता चे दरम्यान एका चारचाकी वाहनातून तीन ते चार इसम ज्यांनी आपले चेहरे रुमालाने बांधलेले होते त्यांनी विश्वास कांबळे ह्यांना जबरदस्तीने गाडीत टाकले हे करत असताना ते जिवाच्या आकांताने वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते त्यावेळी तेथील काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यानी सुसाट गाडी पळविली तेथील उपस्थित नागरिकांनी गाडीचा पाठलाग केला व गाडीवर दगड सुद्धा मारले त्यामधे गाडीचा काच सुधा फुटला असल्याचे कळते त्यानंतर ती गाडी गुंज कार्ली मार्गे पसार झाली दरम्यान त्या गाडीमध्येच त्यांचा गळा आवळून किंवा आणखी काही प्रयोग करून त्यांचा मृतदेह गुंज फाट्यावर टाकून दिल्याची माहिती आहे मागील एक दोन वर्षापासून त्यांच्या बोराळा ह्या गावातील च एका धनदांडग्या व सवर्ण समाजातील जातीयवादी कुटुंबाकडून त्यांच्यावर अन्याय करण्यात येत होता, मध्यंतरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल होऊन त्या जातीयवाद्याला जवळपास 21 दिवस तुरुंगात राहावे लागले होते जेल मधून सुटून आल्यानंतर मनात खुन्नस धरून बौद्ध समाजाच्या विश्वास कांबळे व इतरां विरोधात खोटे रिपोर्ट देऊन पैश्याच्या जोरावर गुन्हे दाखल करून अतोनात त्रास देत असे दोन महिन्यापूर्वीच झालेल्या ग्राम प निवडणुकीमध्ये त्या हारामखोर जातीयवादी व्यक्तीचा व त्याच्या पॅनल चा दारुण पराभव झाला व स्वाभिमानी विश्वास कांबळे ह्यांचे पॅनल निवडून आले व ते स्वतः उपसरपंच म्हणून निवडून आले , यांच्यामुळेच जेल मध्ये राहण्याची आलेली वेळ व निवडणुकीत झालेला पराभव ह्या रागातून गुन्हेगारी व्यक्तींना हाताशी धरून नियोजन बद्ध पद्धतीने त्यांचा खून करण्यात आलेला आहे, त्याच्या गेल्यावर व पोटावर स्पष्ट खुणा दिसत आहेत, सध्या त्यांचे पार्थिव शरीर वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात पोष्टमार्टम साठी ठेवलेले आहे. त्या आरोपींनवर अनुसुचीत जाती जमाती प्रतीबंधक कायदयान्वये सह ईतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे परंतु आरोपी अद्याप फरार आहे