– पोलिसांच्या समयसुचकतेने अनर्थ टळला, चार आरोपी जेरबंद, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला”
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
प्रतिनिधी , २० फेब्रुवारी चिखली : – “संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वधर्मीय व सर्व जातीपंथांच्या नागरिकांनी हर्षोल्हासात साजरी केली असताना,इकडे मेरा खुर्द येथील एका समाजकंटकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तनावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी धावल्याने दंगलसदृश परिस्थिती निवळली. ही घटना मेरा खुर्द फाट्यावर २० फेब्रुवारी रोजी ८ वाजता घडली. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथे ६० टक्के मुस्लिम समाज आणि इतर ४० टक्के समाज आहे . पूर्वी पासून या गावामध्ये दोन्हीं समाज एकोप्याने राहतात . या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यकाळ आटोपला असून ग्रा. प.वर प्रशासक लागले आहे त्यामुळे गावात निवडणुकीचे वातावरण पसरले आहे . अशातच काल संपूर्ण देशभरात छ्त्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी झाली असली तरी चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे एका समाजकंटक तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. ही बाब गावातील तरुणांच्या लक्षात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. तोडफोडीचाही प्रकार घडला. गावातील सुज्ञ नागरिकांनी समजस्याची भूमिका घेऊन, वातावरण शांत केले, तसेच तातडीने पोलिसांना माहिती दिली. अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर व त्यांचे सहकारी हे लगेचच गावात पोहोचले. त्यांनी सर्वधर्मीय नागरिकांना शांततेचे आवाहन करत, गावात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला. तसेच, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणार्या समाजकंटकांची धरपकड केली.अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी अत्यंत संयमाने व कुशलतेने परिस्थिती हाताळून वातावरण शांत केले. तसेच, ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. आक्षेपार्ह स्टेटसचा व्हिडिओ शेअर केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारादेखील देण्यात आला आहे. सद्या बुलढाणा येथून आरसीबीची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली असून, बुलढाणा येथील वरिष्ठ पोलिस अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सद्या गावात कडेकोट बंदोबस्त असून, तणावपूर्ण शांतता आहे.”याबाबत ठाणेदार गणेश हिवरकर यांना विचारले असता त्यांनी सागितले की चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणेदार गणेश हिवरकर यांनी केले आहे. गावातही तनावाचे वातावरण नाही दोन्ही समाजाचे लोक सहकार्य करीत आहेत. असे दै देशोन्नती शी सागितले . यावेळी अंढेरां ठाणेदार गणेश हिवरकर , दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे , बिट अमलदार शिरसाट , पोफळे , वाघ , राठोड , उगले , जाधव , गवई , आदींचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे .