बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
आपले वडील सिताराम साळवे यांच्या व्दितीय स्मृतीदिना निमीत्त तुकाराम आश्रय वृध्दाश्रमास रुपये पाच हजारची आर्थीक मदत सोहम पॅथाॅलाॅजी लॅब सिंदखेड राजाचे संचालक बाबासाहेब साळवे यांनी केले. आमचे वडील सिताराम साळवे हे अत्यंत गरीब परीस्थीतीतुन प्रगती करत शासकीय सेवा केली. नोकरीत असतांनासुध्दा त्यांनी भुकेल्याला अन्न, नागडयाला कपडे, उघडयाला चादर, गरम कपडे तर कधी आर्थीक मदत, जेवन कींवा दवाखाना सुध्दा मोफत केला आहे. त्यांनी आम्हा भावंडांनाही उच्च शीक्षीत करुन चांगली वागणुक व शीकवण दिली त्याचेच फलीत आज आम्ही समाजात ताठ मानेने जिवन व्यतीत करीत आहे त्यांच्या आडवणींना उजाळा मीळावा तसेच त्यांच्या कार्याचा वसा कायम ठेवत तुकाराम आश्रय वृध्दाश्रमातील वृध्दांच्या जिवनात काही आनंदाचे क्षण मीळावे यासाठी आमच्या साळवे परीवाकडुन रुपये पाच हजारची आर्थीक मदत देण्यात येत आहे. असे प्रतीपादन बाबासाहेब साळवे व सत्यभान साळवे यांनी केले. यावेळी सुखदेव पगारे व कडुबा निकाळजे यांनी सुध्दा प्रत्येकी दोन हजाराची आर्थीक मदत दिली. त्यांनी दिलेल्या आर्थीक मदतीसाठी तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाचे संचालक प्रशांतभैया डोंगरदिवे व रूपालीताई डोंगरदिवे यांनी आभार व्यक्त केले.यावेळी बाबासाहेब साळवे,सत्यवान साळवे, आप्पासाहेब राजभोज, सुखदेव आढावे, सुखदेव पगारे गुरुजी, दिपक पगारे, गौरव तायडे, सुनिता राजभोज, अनिता चौथमोल, रत्ना तायडे, जया पगारे, वर्षा साळवे, लता साळवे वैरंजा साळवे, विनया साळवे, परी साळवे, समिक्षा साळवे यांच्यासह ईतर नातेवाईक उपस्थीत होते.