बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
सन २०२२ -२०२३ या वर्षात श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिखली ने भरीव कामगिरी केली आहे. विविध स्पर्धेतील खेळाडूंचा दिनांक २३/२/२०२३ रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, स्वीकृत सदस्य डॉ.पी.एस. वायाळ, शाळा तपासणीस अधिकारी प्रकाश अंधारे आजीवन सदस्य विष्णूभाऊ पाटील, मधुकरराव पाटील, सत्यजित राऊत, डॉ. चिंचोले, शाळेचे प्राचार्य नंदकिशोर गायकवाड, उपप्राचार्य जी.एस. जाधव पर्यवेक्षक डॉ. अनंत कुमार चेके, अरुण भाऊ शिंदे उपस्थित होते.नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तर शालेय खोखो स्पर्धेत विद्यालयाचा १७ वर्षाआतील मुलांचा संघ सहभागी झाला. तसेच १७ वर्षाआतील मुलींचा संघ व१४वर्षाआतील मुलांचा संघ विभाग स्तरावर उपविजेता ठरला. नांदेड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तर शालेय तलवारबाजी स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील कु. अदिती मघाडे हिने ब्रांझ मेडल प्राप्त केले असून सुजित पवार हा सुद्धा राज्यस्तर स्पर्धा खेळला. नुकतीच भंडारा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तर शालेय तलवारबाजी स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात विद्यालयाचे खेळाडू उन्नती अशोक सराफ व वंश अनिल सराफ यांनी सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. फलटण जि. सातारा येथे संपन्न झालेल्या खो-खो च्या१४ वर्षाआतील राष्ट्रीय स्पर्धेत कृष्णा नंदकिशोर तातडे ने यशस्वी कामगिरी केली. खेळाडू सोबतच प्रभारी क्रीडा शिक्षक कैलास करवंदे यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.