शिवणकामच्या प्रशीक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप
ऋणानुबंध समाज विकास संस्था व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त अभिवादन तसेच संस्थे मार्फत शिवणकाम प्रशिक्षित महिला भगिनींना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. सौ अनुजाताई सावळे पाटील जिल्हा अध्यक्षा राष्ट्रवादी महिला काॅग्रेस, कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ स्वाती अनंता डोंगरदिवे, प्रमुख उपस्थीतीत सौ आशाताई भारत कस्तुरे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी महिला काॅग्रेस, सौ. लक्ष्मीताई कस्तुरे राष्ट्रवादी महिला नेत्या हया होत्या. ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्या वतीने तुकाराम आश्रय वृध्दाश्रम च्या माध्यमातुन निराधार, बेघर वयोवृध्दांची सेवे सोबतच बहुजन महापुरुषांच्या जयंती पुण्यतीथीच्या नीमीत्ताने अभिवादन व सुशीक्षीत महीलांना स्वयंरोजगारासाठी मोफत प्रशिक्षन देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचे काम ऋणानुबंध संस्थेच्या वतीने सौ रुपाली प्रशांत डोंगरदिवे व प्रशांतभैया डोंगरदिवे हे करीत आहे. यांचे कार्य कौतुकास्पद असुन समाजाने यांची हात बळकट करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी समोर आले पाहीजे असे प्रतीपादन उद्दघाटक म्हनुण प्रा. सौ अनुजाताई सावळे पाटील यांनी व्यक्त केले. तर तुकाराम वृध्दाश्रमाच्या माध्यमातुन बहुजन महापुरुष संत गुरु यांच्या विषईची माहीती गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे काम होत असल्याचे प्रतीपादन अध्यक्षा सौ स्वाती अनंता डोंगरदिवे यांनी केले.यावेळी प्रास्तावीक सौ रुपाली प्रशांत डोंगरदिवे तर सुत्र संचालन प्रियंका वानखडे तर आभार प्रदर्शन सौ किर्ती विनोद डोंगरदिवे यांनी केले. यावेळी कांताबाई डोंगरदिवे, कावेरी डोंगरदिवे, दुर्गा साबळे, पुजा शरद डोंगरदिवे, निकीता राजु डोंगरदिवे, रोशनी भास्कर डोंगरदिवे, पुजा संजय वानखेडे, निकीता अनंता पवार, शितल विकास डोंगरदिवे, संजिवणी नितीन खरात, निर्मला अविनाश डोंगरदिवे, शितल रामदास सरोदे, कविता अमोल डोंगरदिवे यांच्यासह ईतर महिला उपस्थीत होत्या.