षुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
दिनांक 27फेब्रुवारी रोज सोमवारला चिखली तालुक्यातील एकलारा येथे भव्य असे नेत्र तपासणी शिबिर आयोजन करण्यात आली होते. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनराष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली डॉ. पंकज कुमार मिश्रा (राष्ट्रीय अध्यक्ष) गणेश डवरी साहेब (राष्ट्रीय संचालक अध्यक्ष )व आशाताई पाटील (महाराष्ट्र राज्य सचिव ) यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा शाखेच्या वतीने माननीय श्री राजेंद्र लहाने राष्ट्रीय मानव अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय श्री शिवाजी मोरे महाराष्ट्र राज्य मीडिया उपप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संघटनेचे मा. सुनील डोंगरदिवे (बुलढाणा जिल्हाध्यक्ष) मा.विष्णू नवघरे (जिल्हा व्यवस्थापक बुलढाणा) मा.बोर्डे साहेब (उपकार्याध्यक्ष बुलढाणा जिल्हा)मा. सुनील सालकुटे (जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा) गजानन मेहत्रे (जिल्हा संघटक )नासिर हुसेन (चिखली तालुका अध्यक्ष) गोकुळजी शिंगणे सामाजिक कार्यकर्ते, परमेश्वर डीगे (सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष )उषाताई साळवे सामाजिक कार्यकर्ते, अंबादास भाऊ अंभोरे सामाजिक कार्यकर्ते, यांची प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला .नेत्र तपासणीसाठी डॉ. कणखर मॅडम (मेडिकल ऑफिसर )डॉ. गणेश बाहेकर (समुदाय आरोग्य अधिकारी) श्री गाडगे साहेब ,खराटे (आरोग्य सहाय्यक )जायभाये (आरोग्य सहाय्यक) इंगळे (आरोग्य सहाय्यक) भुतेकर (आरोग्य सहाय्यक) मुरकुटे (आरोग्य सहाय्यक )राज दिंडोरी कर्मचारी प्रदीप जाधव सचिन अंभोरे व यांची उपस्थित राहून परिसरातील गरजू रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. मानव राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये या शिबिराच्या आयोजन करण्यात येणार असून चिखली तालुक्यातील अजून 2 /3/2023 प्रा.आ. केंद्र शेलगाव आटोळ तालुका चिखली 9/ 3 /2023 ग्रामीण रुग्णालय चिखली व 15 /3/ 2023 प्राथमिक आरोग्य केंद्र सवना येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.