याप्रकरणी दोषींवर कारवाई करून शासनास अहवाल सादर करा, सार्व. बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य अभियंत्यांना आदेश
विवेक जगतात
बहिष्कृत भारत-सोलापूर प्रतिनिधी
औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुभेदारी शासकीय विश्रामगृह व्यवस्थापक रशीद शेख आणि इतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवरती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी RPI(A) सोलापूर चे श्री.विवेक जगताप यांनी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्री. विवेक जगताप यांनी सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करण्यासाठी व्यवस्थापक रशीद शेख यांच्याकडे लेखी आरक्षण मागणी केली असता व्यवस्थापक रशीद शेख ने अतिरिक्त पैशाची मागणी केली व जाब विचारला असता उलट अरेरावी ची भाषा व वापरुन अपमानास्पद वागणूक दिली. तसेच जगताप यांना या शासकीय विश्रामगृहाच्या रुममध्ये दारुच्या पार्ट्या करतानाचे आढळले तसेच विश्रामगृहातील कर्मचारी कुठलेही काम करत नसून स्वतःच्या खाजगी कामात जास्त दंग असतात. तरी या शासकीय विश्रामगृह प्रशासनाच्या अनागोंदी कारभार याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विवेक जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपसचिव यांच्याकडे केली आहे. तरी श्री विवेक जगताप यांना सदर प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मान. उपसचिव यांनी दिले आहे, तसेच मुख्य अभियंता सार्व. बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांना याप्रकरणी सखोल चौकशी करून व कायदेशीर कारवाई करुन शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश मान. उपसचिवांनी दिले आहेत. याप्रकरणी कक्ष अधिकारी सु. प्र. मोहिते यांनी हे आदेश जारी केले आहेत.