विजय गजभिये यांचा स्तुत्य उपक्रम
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक विजय गजभिये यांनि ऋणानुबंध समाज विकास संस्था व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर, ता. चिखली, जिल्हा बुलडाणा येथे पाच खुर्च्या दिल्यादान.विजय गजभिये यांनी शासकीय सेवेत असताना आणि सेवेतुन निवृत्त झाल्यावर सुद्धा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती पासुन बुध्द विहार, अनाथआश्रम, वाचनालय, अभ्यासिका व ईतर विवीध सामाजिक ठिकाणी आतापर्यत प्रत्येकी पाच खुर्च्या, पुस्तके, कपाट, शालेय साहित्य व ईतर अत्यावश्यक वस्तु मासिक धम्मदान अंतर्गत दान दिल्या आहेत. बौध्द धम्मातील दान पारामीता चे पालन करीत आतापर्यत भरपुर ठीकाणी विविध वस्तु दान देण्याचा उपक्रम राबविला आहे व निरंतर सुरूच राहिल असे सांगीतले. यावेळी बुलडाणा येथील दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतीनीधी बाबासाहेब जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, प्रमुख मार्गदर्शक विजय गजभिये तर प्रमुख उपस्थीतीत एल एस डवरे सेवानिवृत्त एलआयसी अधिकारी, सिध्दार्थ डोंगरदिवे, सुभाष डोंगरदिवे, शंकर कर्हाडे हे होते. तुकाराम आश्रय वृध्दाश्रमास विजय गजभिये यांनी खुर्च्या दिल्याबद्दल आश्रमाचे संचालक प्रशांतभैया डोंगरदिवे व सौ. रुपाली डोंगरदिवे यांनी आभार व्यक्त केले. तसेच सुत्रसंचालन प्रीयंका वानखडे तर आभार प्रदर्शन सागर डोंगरदिवे यांनी केले. यावेळी दुर्गा साबळे, संगीता वानखडे, कावेरी डोंगरदिवे, किसना डोंगरदिवे, भागाबाई हिवाळे, यमुना मादनकर, इंदिरा डोंगरदिवे, संजय वानखडे, उत्तम महाराज डोंगरदिवे, देऊबाई डोंगरदिवे यांच्यासह तुकाराम आश्रय वृध्दाश्रमातिल वृध्दांसह ईतर उपस्थीत होते.