वधु पित्यास 20,000/- शासकीय अनुदान
महाराष्ट शासनाच्या कन्यादान योजनेअंतर्गत ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली व तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर व्दारा आयौजीत सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. लग्न समारंभाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि विवाह सोहळ्यातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामुहिक विवाह सोहळ्यांना शासनाच्या वतीने प्रोत्साहन देऊन, अशा विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांना 20 हजार रुपये इतके अनुदान आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ‘कन्यादान योजना’ आहे.समाजातील मागासवर्गीयांचे विवाह वाढत्या महागाईत कमी खर्चात व्हावे व मागासवर्गीय कुटूंबांचा विवाहावर होणा-या अनाठाई खर्चावर नियंत्रण रहावे यासाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे एकुण तीन टप्प्यामधे दि. 31मार्च 2023, दि. 30 एप्रील 2023 व दि. 31 मे 2023 रोजी नियोजित केला आहे. तरी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा लाभार्थ्यांनी ऋणानुबंध समाज विकास संस्थाचे मुख्य कार्यालय नविन तहसिल समोर वार्ड नं. 9 शहिद अब्दुल हमिद नगर चिखली किंवा तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर ता. चिखली जि. बुलडाणा येथे संपर्क करावा तसेच सदर योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत १) अर्जदार यांचा विहीत नमूण्यात अर्ज२) बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याबाबत वर/वधू यांनी लिहुन द्यावयाचे विहीत नमूण्यात प्रतिज्ञापत्र.३) जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत.४) महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याचा पुरावा.(५) लाभार्थ्याचे पालक हे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधीत शेतकऱ्याच्या जमीनीचा 7/12 चा उतारा व त्या गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला६) लाभार्थ्याचे पालक हे शेतमजूर असल्याबाबत संबंधीत गावातील तलाठी / ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र व त्या गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला7) वधु वराचे आधार कार्ड8) पालकाच्या बँक पासबुकची झेरॉक्स9) अविवाहीत प्रमाणपत्र (वधु व वर)10) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (वधुच्या वडीलांचे / आईचे)11) विवाह नोंदणी प्रमाणपत्र12) आधार कार्ड वधुच्या आई वडिलांचे कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 8855850378, 9689331853 यानंबरवर संपर्क करावा असे आवाहन ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्यावतीने कळविण्यात आले आहे.