आली आली झुक झुक आगीनगाडी
जालना खामगाव रेल्वे मार्गाला जोडी़़
विदर्भाच्या विकासाची विकास नाडी
.हसू लागली, फुलू लागली वस्ती वाडी.
रेल्वे लोक आंदोलन समितीला एकच ध्यास.
शेती आणि मातीचा संपविण्या वनवास.
जिल्ह्याला हवा आता रेल्वेचा सहवास.
करूया विदर्भाचा औद्योगिक विकास.
श्वेता ताईंचे मानूया जाहीर आभार.
फडणवीस साहेबांचे शिंदे सरकार.
पंढरीनाथ पाटील ते भटकर साहेब खासदार.
तुम्ही सगळेच या विजयोत्सवाचे शिल्पकार.
अर्थसंकल्पात घोषणांचा केला आटापिटा.
प्रत्येकाने उचलावा आता आपापला वाटा.
गोरगरीब रयतेच्या खुल्या करा प्रगतीच्या. वाटा.
नाहीतर जनता आता काढेल तुमचा काटा.
नको नुसती पोकळ आश्वासनांची हवा.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होऊ नये अफवा.
सुवर्णमहोत्सवात रेल्वेचा लाभ जिल्ह्याला. हवा.
नाहीतर तुमच्या सत्तेला आता काडी लावा.
हि .रा .गवई