बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
शेगांवला येणाऱ्या 6 भाविकांचा जागीच मृत्यू !आता समृद्धी महामार्ग झाला मृत्यूचा सापळा, जखमींवर उपचार सुरूआता समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनू लागला असून, शेगांव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या 6 भाविकांचा अपघातस्थळी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे समृध्दी महामार्गा सापळा होतो की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सुरक्षाविषयक कुठल्याही उपाय योजना शिवाय हा महामार्ग का सुरू करण्यात आला?.समृध्दी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढू लागलेले आहे. आज रविवार १२ मार्चला सकाळी या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचाजागीच मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजी नगरहून शेगावला जात असलेल्या भरधाव वेगात असलेल्या कारने पलटी मारल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.बुलढाण्यातील मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ कार आली असता तीने कोलांट्या घेतल्या. या कारमध्ये ९ प्रवासी होते. यापैकी काही मुले आणि महिला देखील होत्या. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.