उदरनगर परीससातील सर्व शेतकरी उतरले रस्त्यावर
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
उदयनगर येथे बुधवार १५ मार्च, रोजी सकाळी साडे आठ वाजता परीसरातील सर्व शेतकरी बाधवाच्चा वतीने रास्तारोको …आंदोलन करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की उदयनगर प परीसरातील २५ ते ३० गावाच्या शिवारात २८ डिसेंबर रोजी गारपीट झाली होती यामुळे तिन हजार दोनशे हेक्टरवरील संत्रा बाग तसेच तुरहरबरा कांदा पपई पीकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते महसूल विभागाचे अधीकारी कृषी तसेच पंचायत समीतीच्या अधीकारी कर्मच्यारानी प्रत्यक्ष शेतावर जावुन पंचनामे करत तहसीलदार तालुका कृषी अधीकारी तसेच गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर केले होते मात्र अद्याप नुसकान भरपाई मिळाली नाही. १५ मार्च रोजी खामगाव _चिखली या राज्य महामार्गावर उदयमगर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.नायब तहसीलदार मुंढे साहेब यांनी लेखी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यात आलेयावेळी मनोज लाहुडकार जितेंद्र पुरोहित चक्रधर लांडे अमोल बोरपी संजय धुरंधर शेख रफीक ज्ञानेश्वर सवडतकर राजेश बिडवे अमोल तोंडे विष्णू पाटील महादेव ठाकरे बंडुभाउ बिडवे महादेव घणमोडे रामेश्वर कचाले महादेव गायकवाड राजु जिने राजु राठी किरणं दाणवे रमेश दांदडे महावीर जैन नारायण जंवजाळ विजय मोरखडे अकाश राउत तसेच परीसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.