उ
बुलढाणा: प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या मिळत असलेल्या विविध योजनेच्या लाभापासून २०१६-१७ पासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांचा अनुदान लाभार्थी महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करुन दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावे अशी मागणी करत २० मार्च रोजी मुकेश भंडारे यांनी उपोषण सुरू करत २१ मार्च रोजी तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे यांच्या लेखी आश्वासनाने सांगता करण्यात आली. जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना तसेच मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत बुडीत मजुरी योजने अंतर्गत राबविण्यात येणारे लाभ २०१६ पासून पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे मुकेश भंडारे सोमवारी उपोषनास बसले होते यावेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विष्णु कुळसुंदर, उदयनगर चे सरपंच मनोज लाहुडकार, तालुका काँग्रेस सचिव शे रफिक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (ओ. बी. सी) विभाग उपाध्यक्ष राम डहाके यांनी उपोषण मंडपात भेट देऊन आपला सहभाग नोंदवला होता. तरी २१ मार्च मंगळवारी सकाळी ११ वाजता तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर उदय राजपूत व डॉक्टर दिपाली तवर यांना संबंधित आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला कळविण्याचे आदेश तर मुकेश भांडारे यांना १५ दिवसात महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे लेखी आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेली उद्धव साठे, दिपक तायडे, सुनिल गवई, नारायण गुंड, शे इलयास शे मुसा, सचिन घोडे, भास्कर गवळी सह लाभार्थी महिला उपस्थित होत्या.