बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी व पत्रकार संपुर्ण महाराष्ट्रात सक्रीय असलेल्या लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक,अध्यक्ष, साचीनजी बोंबले यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य सचिव मा.संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार हा महत्वाचा घटक असतो. म्हणुन त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखले जाते.आणि त्या पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकशाही मराठी पत्रकार संघ सदैव पत्रकारांच्या पाठीशी उभा असेल असे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा.रवी मगर यांनी सांगितले.ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदी शिवाजी मोरे यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा. रवी मगर यांनी सांगितले.