बाबासाहेबांचे मराठी मधील दुसरे पाक्षिक बहिष्कृत भारत आपल्यासमोर डिजिटल मीडिया म्हणजेच वेब पोर्टल च्या माध्यमातून सुरू करण्यात आले.*
ज्यात बाबासाहेबानी लिहलेल्या सर्व लिखाण तसेच संपादकीय लेख समाविष्ट आहेत त्याचबरोबर बाबासाहेबाना अपेक्षित पत्रकारिता करण्याकरिता आपण बहिष्कृत भारत या मराठी न्युज पोर्टलच्या माध्यमातून चळवळीस समर्पित केले आहे .3 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता या पोर्टलचे अनावरण नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक तथा बहिष्कृत भारत डिजिटल मीडिया चे संपादक दादाराव नांगरे यांनी BIT चाळ येथे केले .
लोकार्पण संबोधन करताना ते म्हणाले की
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की
“कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.”
डॉ बाबाबसाहेबांनि 3 एप्रिल 1927 ला मराठी पाक्षिक “बहिष्कृत भारत” सुरू केले .त्यांनी एकाच वेळी असमानतेच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय प्रकारांविरूद्ध निर्णायक संघर्ष केला. यामुळे टीकाकारांनी त्याच्यावर हल्ला केला. द्विज देशभक्त मासिकांनी त्यांच्यावर अनियंत्रित आरोप केले. डॉ. आंबेडकरांना आपले मत मांडण्याची आणि विरोधकांच्या मताची वस्तुस्थितीशी व तार्किकदृष्ट्या, परंतु जोरदारपणे टीका करण्याची दृढनिश्चय त्यांच्या डोळ्यासमोर आली. ‘बहिष्कृत भारत’ त्यांची आवश्यकता पूर्ण करण्याचे साधन बनले.
दोन शब्दांत दोन भारत !,बहिष्कृत, पण भारत! भारत पण बहिष्कृत! बहिष्कृत भारताच्या माध्यमातून आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना सल्ला देण्यास व टीकाकारांवर हल्ला करण्यास सुरवात केली.
आज तेच पाक्षिक नव्या रुपात म्हणजे डिजिटल मीडिया-न्युज पोर्टल च्या रुपात आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
ज्यात बाबासाहेबानी लिहलेल्या सर्व लिखानाचे तसेच संपादकीय लेखाना समाविष्ट करत आहोत.डॉ बाबासाहेबांना अपेक्षित चळवळीच्या लेखकांसाठी आणि पत्रकारांसाठी बहिष्कृत भारत हक्काचा प्लॅटफॉर्म असेल .
त्याचबरोबर बाबासाहेबाना अपेक्षित पत्रकारिता, दर्जेदार आणि निष्पक्ष बातम्या सुद्धा इथं वाचू शकता .
ज्यांना पुस्तके वाचणे शक्य नाही अशांना वेबसाईट च्या माध्यमातून बाबासाहेबांचे लिखाण वाचायला मिळेल त्याचबरोबर दर्जेदार आणि निष्पक्ष बातम्या सुद्धा वाचायला मिळेल.
त्याचबरोबर बाबासाहेबांच्या चळवळीत कार्य करणाऱ्या सर्वच लेखकांना बहिष्कृत भारत हक्काचे पोर्टल असेल .
3 एप्रिल 2024 रोजी त्याचा तिसरा वर्धापन दिवस संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर येथे सायंकाळी ठीक 7 वाजता साजरा होत आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती
आपलाच
अॅड.दादाराव नांगरे
कार्यकारी संपादक
बहिष्कृत भारत डिजिटल मीडिया
7977043372
वेबसाईट
http://bahishkritbharat.digital/
युट्यूब चॅनेल
https://youtube.com/c/BahishkritBharatmedia
फेसबुक पेज
https://www.facebook.com/bahishkritbharat.digital/
इन्स्टाग्राम https://www.instagram.com/bahishkritbharatmedia
ट्विटर
https://twitter.com/BahishkritB1