बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
चिखली-: सम्राट अशोक फुले-आंबेडकर जयंती उत्सव समिती चिखलीच्या वतीने रविवार ९ एप्रिल पासून शुक्रवार १४ एप्रिल पर्यंत शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक तथा समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फुले आंबेडकर वाटिका येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी एस. एस. गवई, तर उपाध्यक्ष श्रीकांत शिनगारे, विकास कस्तुरे, प्रा राजेंद्र गवई, विलास जाधव, सुमित जाधव, एन के सरदार, पमन सोनुने, चेतन इंगळे, विकास माघाडे, सीमाताई मिसाळकर, विश्वजीत जाधव, एड विनोद बनकर, सचिव प्रा माघाडे, सहसचिव जयाताई आराख, कोषाध्यक्ष विशाल खरात, सह कोषाध्यक्ष अविनाश बोर्डे, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रताप मोरे, विनोद पवार, राहुल पवार, छोटू कांबळे, प्रशांत डोंगरदिवे, विनोद खरे, संजय निकाळजे, विजयकांत गवई, काशिनाथ शेळके यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी जयंतीच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून रविवार ९ एप्रिल रोजी सकाळीनऊ वाजता धम्म ध्वजारोहण व सामूहिक बुद्ध वंदना, सायंकाळी सात वाजता व्याख्यान विषय सम्राट अशोक लोककल्याणकारी राज्यकर्ता, वक्ते बी ओ बोर्डे माजी गटशिक्षणाधिकारी, राजेश साळवे सर. सोमवार १० एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता संविधान चेतना रॅली, संविधान प्रचारक राजेश गवई चिखली. सायंकाळी सात वाजता व्याख्यान, व्याख्याते प्रा डॉ सुरेश शेळके परभणी, विषय- फुले आंबेडकर विचार आणि तत्व. मंगळवार ११ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले जयंती, सकाळी नऊ वाजता क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांना अभिवादन, सायंकाळी सात वाजता रमाकांत भालेराव दिग्दर्शित स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फुले शाहू आंबेडकर चळवळीवरील नाटक, स्थळ- तालुका क्रीडा संकुल चिखली. बुधवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता विद्रोही जलसाकार लोकशाहीर संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, स्थळ- तालुका क्रीडा संकुल चिखली, गुरुवार १३ एप्रिल रोजी सकाळी दहा ते तीन पर्यंत भव्य रक्तदान शिबिर, सायंकाळी पाचते सात भीमगीत गायन स्पर्धा, वयोगट पाच ते अठरा व खुला, सायं सात वाजता भीम गीतांचा आर्केस्ट्रा- स्वराली सादर करते गौतम पहरे व संच खामगाव. रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी. शुक्रवार १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, सकाळी ७:३० वाजता समता सैनिक दल व आजी- माजी सैनिक यांच्या वतीने मानवंदना. सकाळी आठ वाजता मोटरसायकल रॅली सकाळी साडेदहा वाजता गुणवंतांचा सत्कार, प्रमुख अतिथी तहसीलदार सुरेश कवळे, ठाणेदार विलास पाटील, मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे, व्याख्यान प्रा धम्मरत्न वायवळ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा, विषय- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण. सायंकाळी पाच बाजता वेगवेगळ्या नगरातून शहराच्या मुख्य रस्त्याने फुले आंबेडकर वाटिकेपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या आयोजित शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तथा समाज प्रबोधन पर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.