मांडवगण फराटा येथील व परिसरातील असंघटित व्यापारी वर्गाला संघटित करून सामाजिक न्यायाची लढाई लढणारे, चहा विक्री करत उदरनिर्वाह करणारे हरिभाऊ फराटे यांच्या घराला नुकतीच अचानक पणे आग लागून त्या आगीत त्यांचे संपूर्ण संसार जळून खाक झाला .घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असतानाही गावातील सर्व समाजाला धरून सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहात आपली आर्थिक परिस्थिती नसतानाही समाजामध्ये आपले व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी नेहमी मदत करत असतात. आज त्यांच्यावरच ही परिस्थिती ओढवली होती त्यातून सावरण्यासाठी समाजाने अनेक मार्गाने अनेक प्रकारे मदत केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाजी फराटे व त्यांचे सर्व सहकारी यांनी त्यांना संसार उपयोगी वस्तू भेट दिल्या त्यांच्या घराला अचानक आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झाला, याची माहीती पुणे जिल्हा रीटेल व्यापारी संघाला कळाली, परंतु कॉन्फरडेशन ऑल ऑफ इंडिया ट्रेडर्स कॅट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन दिनकर निवंगुणे हे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे असल्याने परत आल्यावर आज सोमवार दि 24/4/23 रोजी दुपारी काही संघटना प्रतीनीधी यांनी हरीमामा फराटे यांची भेट घेतली, या घटनेने हरी मामा यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, या घडलेल्या घटनेतुन बाहेर पडण्यासाठी व त्यातून सावरण्या साठी पुणे जिल्हा रीटेल व्यापारी संघटनेने काही महत्त्वपूर्ण वस्तु तसेच आर्थिक 35,000 रूपयांचा धनादेश फराटे कुटुंबाला मदत ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत व संघटनेचे पदाधिकारी शिरूर तालुका अध्यक्ष प्रविन चोरडीया,दौंड तालुका अध्यक्ष संतोष शेलोत, मा.किरण शिंदे, आशोक शहाणे,अप्पा वाव्हळ, शौकत भाई इनामदार, कपील पगारीया, बाळासाहेब चौधरी , गणेश जगताप संतोष बोरा काशिनाथ पवार विठ्ठल पवार तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. माजी उपसरपंच संजय फराटे यांनी ऋण व्यक्त केले