मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत असलेल्या दवाखान्याच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते/इसवे यानी अहोरात्र रुग्णाला सेवा दिली.जनतेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता ,शासनाने नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त काम करत त्यांनी गावात व दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावात एक आदर्श निर्माण केला .कुठलीही अपेक्षा न ठेवता शासनाच्या दिलेल्या वेतनावर अहोरात्र काम करणे ,त्या स्वतः गरीबीतून शिक्षण घेऊन या पदापर्यंत पोहोचलेल्या असल्याने गरिबीची जाणीव त्यांना आहे.आपण शासनाचे नोकर असून त्याच बरोबर आपण समाजाचेही काही देणं लागतो याचा विचार करून त्यांनी आपली सेवा मी संकोच व प्रामाणिकपणे दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व लोकांना त्या देत असतात.काम करत असताना अनेक संकटे आली त्या प्रत्येक संकटाला आपल्या कामातून उत्तर देत त्यांनी आपली सेवा दिली.नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून काम करून घेऊन सर्वांच्या मदतीने आलेली सर्व कामे प्रामाणिकपणे करणे हा त्यांचा हातखंडा होता.याची दखल म्हणून महाराष्ट्र शासन ,जिल्हा परिषद पुणे .यांनी संपूर्ण दवाखान्याची कार्याची दखल आपल्या स्तरावर घेऊन शिरूर तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच पुणे जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून गावाच्या शिरशेपात मानाचा तुरा व गावाला साजेल अशा पुरस्कार प्राप्त करून दिला .सदर पुरस्कार हा
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून डॉ. मंजुषा सातपुते / इसवे व त्यांच्या संपूर्ण स्टाफला त्यांच्या चांगल्या कामाबद्दल गौरवण्यात आले