राजस्तरीय मंथन परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणाट या शाळेच्या विधार्थी प्रज्वल संतोष भालेराव याने ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक फटकवला. त्याला या परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन त्याच्या वर्गशिक्षेका सुवर्णाताई नानासाहेब धुमाळ यांचे लाभले. अहमदनगर या ठिकाणील नदंनवन लॉन्स या ठिकाणी प्रज्वल संतोष भालेराव याचा सन्मान जेष्ठ साहित्यक डॉ.संजय कळमकर याच्या हस्ते गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देउन करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड,शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर ,डॉ.अक्षयदीप पाटील, डॉ.रेखा पाटील,डॉ.वैभव आजमोरे,प्राध्यापक अशोक जोंगदे,वर्गशिक्षिका सुवर्णा धुमाळ ,नानासाहेब धुमाळ,राम पवार,वैशाली पवार,नंदाकिनी कोहकडे,संतोष भालेराव,दीपाली भालेराव इ. उपस्थीत होते.