बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
आज दिनांक 21 मे 2023 ला बुलढाणा रेडिओ वेलकम 90.08 एफ. एम. वर सकाळी दहा वाजता व सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या शब्द साहित्यिकांचे सदरामध्ये कवी व लेखक ही रा. गवई यांच्या मराठी भाषा, शूरवीर क्रांतिकारकांनो या कवितांचे व शेतकऱ्यांचे ऊर्जा स्त्रोत डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या अतिशय अभ्यासपूर्ण लेखाचे वाचन करण्यात येणार आहे. तरी श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रेडिओ वेलकम बुलढाणा यांनी केले आहे.हि.रा गवई यांनी या अगोदर अनेक कवी संमेलनामध्ये आपल्या कवितांचे वाचन केले आहे. तसेच ते विद्यार्थी प्रिय शिक्षक असून सुई धागा फेम म्हणून महाराष्ट्र न्यूज चॅनलने त्यांची विशेष मुलाखत घेतलेली आहे. जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना मिळालेल्या या संधीबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सर्व मान्यवरांनी तसेच विदर्भ प्रदेश सरचिटणीस राज इंगळे सर , अमरावती विभागीय अध्यक्ष शिवा प्रधान सर व जिल्हाध्यक्षा वर्षा इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या शब्द साहित्यिकांचे सदरामध्ये संधी प्राप्त करून दिल्याबद्दल बुलढाणा रेडिओ वेलकम चे पूर्ण संचालक मंडळ संजय तुपकर, अभिमन्यू गाडे, भरत जाधव अंकुश नवले, उद्घोषक व केंद्रप्रमुख तसेच संकलक नरेंद्र नरवाडे साहेब यांचे हि.रा गवई यांनी विशेष आभार मानले आहेत