बूलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महिलांना एकात्मिक महिला बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने ३१ मे रोजी डासाळा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला डासाळा ग्रामपंचायतचे सरपंच विजय मोरखडे, उपसरपंच मनीषा पैठणे यांच्याहस्ते ह.भ.प.मिराताई सोनुने, रुखमाबाई मुकिंदा साठे, यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने मान्यवरांनी सन्मानित केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बेलोकारदशरथ गवई रतन पैठणे सुनील ठाकरे विजय सोनुने. सचिव विजय शेळके , अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच गावातील महिला मंडळ व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील नागरिक महिलांची उपस्थिती होती