बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
दिनांक 23 जुलै 2023 होऊ घातलेल्या साहित्य संमेलनअखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अमरावती विभाग व्दारा आयोजित संत गाडगे बाबा राज्यस्तरिय साहित्य संमेलनाच्या सुकाणू समिती मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी मा.राज इंगळे प्रदेश सरचिटणीस, यांची संमेलन कार्यवाहक म्हणून तर मा. वर्षाताई राज इंगळे जिल्हाध्यक्ष यांची सहसचिव म्हणून तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हि.रा.गवई जिल्हा सल्लागार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांची संत गाडगेबाबा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सुकाणू समितीवर कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. सदर नियुक्तीचे श्रेय तीनही मान्यवरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद गोरे, विदर्भ विभागीय अध्यक्ष डॉ.मिलिंद रंगारी संमेलनाध्यक्ष मा.शिवा प्रधान यांना दिले आहे. सदर नियुक्ती बद्दल बुलढाणा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. संमेलन अमरावती विभागासाठी एक वैचारिक मेजवानी ठरणार आहे. संमेलनामध्ये कवी संमेलनापासून वैचारिक परिसंवादापर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. तरी साहित्य क्षेत्रातील सर्व रसिकांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सर्व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवून गाडगेबाबांच्या नावाने होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाची शोभा वाढवावी असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बुलढाण्याच्या जिल्हा कोषाध्यक्ष सौ. नंदिनीताई वैराळ यांनी केले आहे.