हडपसर,मांजरी(बु.)(दि. 7)
ज्ञानज्योत सामाजिक संस्था आणि महिला बचतगटाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सारिका घुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी घुले यांनी मनोगत व्यक्त करताना, “बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते,’ त्यांनी बचत गटाचा आधार घेतला पाहिजे.” असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून विमलाबाई लुकंड महाविद्यालयाच्या शिक्षिका कांचन मुन व कार्यक्रमाचे अध्यक्षा सुनिता पवार उपस्थित होत्या. यावेळी सर्वच मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, व महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षाणाची द्वारे खुली करून दिली म्हणून आजच्या मुली उच्च शिक्षण घेऊन सन्मानाने जीवन जगत आहेत. मुलींनी शिक्षण घेतले तरच त्यांच्यावरचे अन्याय दूर होतील. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे असे विचार मान्यवरांनी यावेळी बोलताना मांडले.
तसेच यावेळी ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित महिलांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानज्योत सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले व जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा कविता (ताई)काळे,सुधा पांचाळ, गायत्री वाणी सुनिता लोंढे,रोशनी कापरे,प्रगती बारावकर सुरेखा ससाने,जयश्री अंबाडे सर्व महिला सदस्य यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी वाळके व कविता काळे यांनी केले.