धर्माबाद( वार्ताहर ) येथील गुजराथी मैदानावर ( दि.12 नोहेंबर 24 दुपारी ) नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण व नायगाव विधानसभेचे डॉ. मीनलताई खतगावकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचंड सभेत काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार इमरान प्रतापगढी यांनी मतदारांना आवाहन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे होते. खासदार इमरान प्रतापगढी यांनी शेर शायरी ने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी त्यांनी महायुतीचे सरकार किती धोकेबाज आहे याचा पाढाच वाचला. देशात बटेंगे तो कटेंगे याचाही समाचार त्यांनी घेतला. देशातील सुजान मतदारांनी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या सरकारला त्यांचा विचार बदलायला भाग पडला. एवढी ताकद मतदारांत आहे म्हणून मतदारांचे अभिनंदन केले. महागाई विषयी बोलताना कफन वरही टॅक्स लावला म्हणून त्यांची खिल्ली उडवली. देशात कोरोना महामारी चालू असताना सरकारमध्ये फूट पाडली अशा खोकेबाज व धोकेबाज सरकारला सत्तेवर येण्यापासून रोखा व महाविकास आघाडीला मत करा असा संदेश दिला. नांदेड पोटनिवडणूक लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण व नायगाव विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. मीनल ताई खतगावकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन खासदार इमरान प्रतापगढी यांनी केले. यावेळी लोकसभेचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण व विधानसभेचे उमेदवार डॉ. मीनलताई खतगावकर यांचेही अभ्यासपूर्ण भाषण झाले. यावेळी माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री शबिर आली निजामाबाद, शिरीष भाऊ गोरठेकर,जाकिर चाऊस,शेख शफी, जावेद सर, श्रीमती परविन शैख, साहेबराव जोंधळे, सदाशिव पोपुलवार, इमरान खान सिरसखोड, चंद्रभीम हौजेकर यांची भाषणे झाली.या कार्यक्रमास खासदार सुरेश शेटकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा, आमदार अकुला ललिता तेलंगाना, चंद्रकला मॅडम जनरल सेक्रेटरी काँग्रेस तेलंगाना, उषा मॅडम तेलंगाना, भास्करराव पाटील भिलवंडे, नागोराव पाटील रोशनगावकर, गणेशराव पाटील करखेलीकर, बाळासाहेब खतगावकर,अब्दुल सत्तार शेठ, हनुमंत पाटील जगदंबे,माजी नगराध्यक्ष दिगंबर लखमावाड, रणजीत पाटील चव्हाण, रामचंद्र रेड्डी, गणेश गीरी, सखाराम निलावार, डॉ. अनिल रत्नाळीकर, रविंद्र शट्टी, बालाजी पाटील कारेगावकर, नरेंद्र रेड्डी, विठ्ठल कोंडलवाडे, निलेश पाटील बाळापुर कर,, युनूस खान पठाण, मारुती पाटील कागेरु ग, जयराम पाटील बाभळीकर,,सुधाकर जाधव, अबेदअली, कदम पा. चिकणेकर,, पोतना लखमावार सर,बालाजी कुदाळे, बंडु पाटील, मीना भद्रे, रंजना सोनकांबळे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमाचे उत्तम नियोजन काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उ बा टा गट कार्यकर्त्यांनी केले. सुत्रसंचलन सुरेश जाधव, चंद्रभीम हौजेकर यांनी केले. शेवटी सुरेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.