धर्माबाद प्रतिनिधी
धर्माबाद – पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथील मराठी विषयाचे प्राध्यापक आणि वक्ते, डॉ.नारायण शिवशेट्टे यांच्या “ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्मय: एक अभ्यास”या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन आज कै.नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स कॉलेज, नांदेड येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.वासुदेव मुलाटे असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील मराठी विभाग प्रमुख व साहित्यिक डॉ.पृथ्वीराज तौर यांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार आहे.या समीक्षा ग्रंथावर सुप्रसिद्ध कथाकार डॉ. शंकर विभुते व सुप्रसिद्ध कवी डॉ.सिध्दोधन कांबळे भाष्य करणार आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.मथु सावंत व ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रामप्रसाद तौर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वरूप प्रकाशन पुणे यांनी केले आहे.