अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची मागणी
लोकशाही मराठी वृत्त वाहिनीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांच्यावर मुंबई पोलीस गुन्हा दाखल करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जाणाऱ्या शक्तीचा आवाज दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे .या घटनेचा चिखली तालुक्यामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन देऊन निषेध नोंदविला आहे .गेल्या दोन महिन्यापूर्वी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आला होता. सोमय्याचा तो व्हिडिओ त्यांच्या नैतिकतेचे धिंडवडे उडवणारा हा व्हिडिओने देशभर खळबळ उडवली होती मात्र किरीट सोमय्या ने साधा ईनकारही केला नाही तसेच त्या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती मी नव्हेच किंवा व्हिडिओ खोटा आहे असा कुठेही दावा केला नाही आणि याचा अर्थ असा होतो की जे दाखवले गेले ते सत्य आणि फक्त सत्यच होते तरीही सोमय्या यांनी पोलिसात तक्रार दाखल केली मुंबई सायबर पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवून रात्री उशिरा कमलेश सुतार यांच्यावर गुन्हे दाखल केले एक प्रकारे कमलेश सुतार यांच्यावर सत्य बातमी दाखवण्याचा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्रात पत्रकारिता करणे अशक्य आहे आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जाणारा सत्तेचा गळा कुठला जातोय का असा सवाल याठिकाणी निर्माण होत आहे जेष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांच्यावर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा अखिल भारतीय प्रमाण पत्रकार संघ चिखलीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा चिखली तालुका अध्यक्ष रघुनाथ गवई यांनी दिला आहे तालुका उपाध्यक्ष जिया काझी कोष्याअध्यक्ष रफिक खान संपर्कप्रमुख सतीश पैठणे सहसचिव दिलीप हातागळे कैलास देशमुख महादेव धुंदळे आदी पत्रकार उपस्थित होते