दि २९ सप्टेंबर
धर्माबाद तालुका प्रतिनिधी
धर्माबाद (गजानन वाघमारे) ईद मिलादुन्नबीचा औचित्य साधून धर्माबाद मुस्लिम समाजातर्फे या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन धर्मबादच्या “टी हेच आर” फँगशन हॉल मध्ये करण्यात आले होते. ईद मिलाद-उन-नबीच्या व गणेश विसर्जन समारंभ स्मरणार्थ २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीची अधिकृत राज्य सुट्टी त्याच दिवशी आल्यामुळे दोन्ही सणांसाठी मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जात असल्याने अडचणी निर्माण होऊ नये म्हणून मुस्लिम समाजाने कार्यक्रम एक दिवस पुढे करून समाजिक सलोखा कायम ठेवली व राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी पुढकार घेऊन एक आदर्श निर्माण केले.
शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्या पासून सयंकाळी ६ पर्यंत हे रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. सुरवातीस आलेल्या प्रमुख मान्यवरांना मुस्लिम समाजा तर्फे सर्वांना शॉल व हार टाकून सर्वांचा स्वागत करण्यात आले. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी सतिश पुदाके,नुसरत कंन्ट्क्शनचे मोईजशेठ बिडीवाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ वेणुगोपाल पंडित, काँग्रेसचे जेष्ठ नेते वर्णी नागभुषण, शिवसेनेचे गणेश गीरी,माजी नगर अध्यक्ष भोजराम गोणारकर,माजी नगरसेवक शेख शादुल, जामा मस्जिदचे इमाम मोहम्मद आझाद मिफताही , मौलाली नगरचे मौलाना शेख इम्तियाज,दारलूमचे सदर सय्यद अल्ताफ अली आदी चा स्वागत करण्यात आल. तसेच कार्यक्रमात लोकमतचे पत्रकार लक्ष्मण तुरेराव,संपादक याहया खान,पत्रकार रज्जाख सर, सय्यद अंसार,वाजीद अली,विकास सर (आर एच) यांची उपस्थिती होती. रक्तदानामध्ये सायंकाळी पर्यंत 132 जनांनी रक्त दान दिले,नांदेडच्या डि.क्रिसेंट ब्लड सेंटर च्या ग्रुप ने ह्या शिबिराचे रक्त जमा करून सर्वांना प्रमाण पत्र दिले.
मुस्लिम समाजातर्फे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ताहेर पठान, पत्रकार साजीद सर,पत्रकार मतीन सर,पत्रकार सय्यद इलियास, अब्दुल खुद्दूस, सय्यद समीर, काँग्रेस अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष फेरोझ खान,शेख सद्दाम आदीनीं परिश्रम घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरचे आभार ताहेर पठाण यांनी वेक्त केली.