भारताबाहेरील विदेशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या “सर्वात मोठ्या” पुतळ्याचे अनावरण अमेरिकेतील मेरीलँड येथे दि.14 ऑक्टोबर रोजी होणार आहे, “स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी” या नावाचा 19 फुटांचा हा पुतळा असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
हा पुतळा प्रसिद्ध कलाकार आणि शिल्पकार राम सुतार यांनी बनवला आहे, राम सुतार यांनी या अगोदर गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थापित सरदार पटेल यांचा पुतळाही बांधला आहे.
“हा भारताबाहेरील बाबासाहेबांचा सर्वात मोठा पुतळा आहे आणि या केंद्रात बांधण्यात येत असलेल्या आंबेडकर स्मारकाचा एक भाग म्हणून स्थापित करण्यात आला आहे,” असे AIC ने सांगितले.
भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा मेरीलँडच्या अकोकीक शहरात 13 एकर जागेवर बांधण्यात आलेल्या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा (AIC) भाग आहे.
“अमेरिका आणि जगाच्या इतर भागातून आंबेडकरी चळवळीचे प्रतिनिधी आणि त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे,” असे त्यात म्हटले आहे.
AIC च्या म्हणण्यानुसार, हे स्मारक बाबासाहेबांचे संदेश आणि शिकवण प्रसारित करण्यासाठी आणि समानता आणि मानवी हक्कांचे प्रतीक प्रदर्शित करण्यासाठी काम करेल.
दि.14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुतळा(Status) अनावरण सोहळ्याला विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.