पुणे दि. 26 –
शहरातील पुणे महानगरपालिका अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह, शिवाजी नगर येथील विद्यार्थ्यांच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘संविधान सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व व करिअर मार्गदर्शन करून वसतिगृहातील विविध समस्या जाणून घेत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.
तसेच भारतीय संविधानातील संदर्भ देत विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करत एकाग्र बुद्धीने अभ्यास करून स्वतःला कस सिद्ध करायच याविषयी आपल्या अनुभवातून अनोख्या शैलीत विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या सन्मानार्थ विविध समाज प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून संविधानाला अभिवादन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजरत्न बलखंडे (अध्यक्ष, विद्यार्थी हक्क समिती) व गृहपाल जितेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश परहर यांनी केले तर आभार आकाश धानवे यांनी मानले.