धर्माबाद -(गजानन वाघमारे )
पंचायत समिती, गटसाधन केंद्र धर्माबाद यांच्या वतीने शहरातील जिजामाता कन्या शाळेत ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.११ डिसेंबर रोजी पार पडले.यात शहरी व ग्रामीण भागातील शाळांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता.
या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटक म्हणून जिजामाता शाळेचे अध्यक्ष संजय पाटील शेळगावकर,तर प्रमुख पाहूणे म्हणून तहसीलदार शंकर हंदेश्वर,गटशिक्षणाधिकारी रविशंकर मरकंटे,विस्तार अधिकारी प्रतापराव पावडे,केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार,एस.बी.कदम,पत्रकार कुणाल पवारे आदीजण यावेळी उपस्थित होते.तालुक्यातील अनेक शाळांनी विविध विषयांवर आधारित प्रयोगाचे सादरीकरण केले.प्राथमिक गटातुन यशवंत विद्यालय धर्माबाद(आरोग्य मानवी शरीर व रचना) द्वितीय क्रमांक.इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल धर्माबाद(नैसर्गिक संसाधने उर्जा तृतीय क्रमांक हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद(शेती-कचर्याचे व्यवस्थापन )माध्यमिक गटातुन प्रथम -गौतमी हायस्कूल करखेली(आरोग्य स्वच्छता) द्वितीय हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद(फायर अलर्ट यंत्र)तृतीय क्रमांक जि.प.हायस्कूल करखेली(धुम्रपानाचे दुष्परीणाम)या शाळेने पटकावला आहे. प्रयोगांचे निरीक्षण प्रा.अरविंद बोधनकर, प्रा. शिंदे,प्रा.गर्दसवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले