बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
विश्व हिंदू परीषद. बजरंग दल. श्रीराम जन्मोत्सव समीती खामगाव व्दारे टावर चौक येथे राम नवमी उत्सव साजरा होत आहे यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिं २८-३-२०२३ मंगळवार रोजी शहरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर रहाणारे. सेवा भावी श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला भजनी मंडळाच्या माध्यमातून देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील २३ वर्षा पासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ पणे ” मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ ” मे हे ध्येय घेऊन वर्ष भर विविध उपक्रम पुथपाथ वरील गोर गरीब लोकांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट व गरम कपडे वाटप. पक्ष्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्या साठी होणारी भटकंती पाहता जल पात्र वाटप. सामान्य रूग्णालयात पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान. दिवाळी ला गोर गरिब लोकांना मिठाई व कपडे वाटप. असे अनेक उपक्रम राबविले जातात ह्या उपक्रमाची ( कार्याची ) दखल घेत देविदास शर्मा यांचा सत्कार करण्यात आला व तसेच भजनी मंडळाचे सर्व सदस्यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी श्रीराम जन्मोत्सव प्रमुख अमोल भाऊ अंधारे. अध्यक्ष नितीन डिडवानीया.उपाध्यक्ष विवेक मोहता.वि.हि.प.जिल्हा मंत्री राजेंद्र सिंग राजपूत. बापु करंदीकर.डाॅ चरखे. राजुभाऊ मुळीक. संयोजक गजानन धोरण. भजनी मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा. प्रसाद तोडकर.दिलीप झापर्डे. अरूण कडवकर. लालाजी सांगळे. विजय भाऊ राखोंडे. सुशीला बाई आवलकर. आशा बाई अंधारे. मंगला बाई बारस्कर. शकुंतला बाई ढवळे. संगिताबाई वाघोळे. जयश्री ताई झापर्डे. पुष्पाताई पवार. अंबिका बाई काटकर. वर्षाताई देशमुख. बेबी ताई आवलकर. लतिका ताई निमकंडे. श्रीमती अनिता ताई तनपुरे. मंगला ताई गुरव. कोरडे ताई. बडगुजर ताई. कुळकर्णी ताई. आयोजक समिती चे सर्व पदाधिकारी. सदस्य.व पुरूष महीलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भाऊ राखोंडे यांनी केले.