बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
स्थानिक श्री शिवाजी विद्यालय चिखली येथील सन 2022- 23 मध्ये एकूण 118 विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित व इंग्रजी ऑलंपियाड परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 19 गुणवंत विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेचे सुवर्णपदक प्राप्त झाले. या सर्व विद्यार्थ्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री एन. एस. गायकवाड, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद श्री मधुकरराव पाटील,उपमुख्याध्यापक श्री जी. एस. जाधव, डॉक्टर अनंतकुमार चेके, श्री ए .ए .शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना श्री रिंढे सर, श्री नवघरे सर, व राजपूत सर यांनी मार्गदर्शन केले.