हिरा गवई

हिरा गवई

श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला येथे मा. सौ.रूपालीताई चाकणकर अध्यक्ष महिला आयोग तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांचा विद्यार्थिनींशी संवाद हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाकरिता श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक कार्यकारणी सदस्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. श्री सुरेश दादा खोटरे तर प्रमुख अतिथी मा.सौ रूपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग, मा.श्री कृष्णा भाऊ अंधारे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला,मा. श्री विजय भाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला मा.श्री अमोलजी मिटकरी आमदार विधान परिषद, सौ.मंदाताई देशमुख,सौ राऊत ताई,सौ वाकोडे ताई,सौ सोनखास्कर मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला सौ.सविता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प.अकोला,श्री प्रकाश अंधारे शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, सौ आघा पांडे सदस्य महिला आयोग, सोनाली ताई ठाकूर सदस्य महिला आयोग, शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय ठोकळ सर उप मुख्याध्यापक श्री विलास गावंडे सर, शिक्षक प्रतिनिधी श्री अमर देशमुख,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री पराग भाऊ ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम माननीय श्री सुरेश दादा खोटरे कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले, माननीय सौ. रूपालीताई चाकणकर यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत व गौरव गीत म्हणून सौ. शुभांगी गावंडे मॅडम व संच यांनी केले तसेच माननीय सौ रूपालीताई चाकणकर यांचा सत्कार डॉ. सौ.निर्मला भामोदे मॅडम व सौ.छाया ठाकरे मॅडम यांनी केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री.प्रकाश अंधारे शाळा तपासणी अधिकारी यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचय डॉ. सौ निर्मला भामोदे मॅडम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे बहारदार संचलन श्री. विक्रम गावंडे सर, तर आभार प्रदर्शन सौ. कविता शेळके मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाकरिता शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

एका सामन्य कार्यकर्त्याला मिळाला न्याय

हाडामासाच्या कार्यकर्त्याला मिळाला न्याय अमडापुर प्रतिनिधी:- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या सोशल मीडिया विभागीय समन्वयक पदी श्री.ज्ञानेश्वर पचांगे यांची...

  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News