माऊली मंदिर प्रतिष्ठान मांडवण फराटाचे उपाध्यक्ष सुरेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ऍलोपॅथिक औषध बनवणारे कंपनीचे इंटिग्रेस मॅनेजर योगेश जगताप यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मांडवगण फराटा येथील केंद्र शाळेतील वराळे वस्ती, भैरू फराटवाडी, दगडवाडी, इनामदार वस्ती ,कोळपे वस्ती व धनगर वस्ती या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच त्या शाळेवर कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना पेनचे वाटप करण्यात आले .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराळे वस्ती येथे मोफत वही व पेन यांचे वाटप करताना शाळेचे मुख्याध्यापक सखाराम फराटे, उपशिक्षक अनिल जगताप, अंगणवाडी सेविका वनिता सोनवणे, मदतनीस झरीना सय्यद व ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने मुख्याध्यापक सखाराम फराटे यांनी आपल्या मनोगतांध्ये सांगितले की योगेश जगताप यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला. अशाच प्रकारचे वाढदिवस समाजामध्ये होत राहिले तर शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. असे म्हणून योगेश जगताप यांचे आभार मानले.