येवला: एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली उमा राजेंद्र कोटमे आज येवला तालुक्यात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन काबाड कष्ट करून आई-वडिलांना रात्रंदिवस शेतीत मदत करून तरीसुद्धा जिद्द आणि आपल्या चिकाटीच्या जोरावर आज तिने एमपीएससी सारखी कठीण परीक्षा पास करून PSI उपनिरीक्षक पदी उत्तीर्ण झालीआहे. उमाने महाराष्ट्रामध्ये मुलाखतीत दुसरा क्रमांक घेऊन सर्वात जास्त मार्क 31 मार्क मिळवले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सुरुवात झालेली मेहनतीच्या जोरावर आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरणारी कष्टाची तयारी असेल तर यश आपण मिळवू शकतो कुठल्याही कारण न सांगत परिस्थितीचा बाऊ करणारे आज मुले आपल्याला आढळतात परंतु याच्यावर सर्व मात करून उमाने ग्रॅज्युएशन 2019 ला पूर्ण झाले असून 2020 ला लगेच पद मिळाले बीएससी मध्ये स्वामी मुक्तानंद विद्यालय मध्ये प्रत्येक वर्षी टॉपर असणारी विद्यार्थी तसेच गणितात मध्ये 90% मार्क मिळवणारी एकमेव होती स्वामी मुक्त विद्यालयाकडून सुद्धा उमा च कौतुक होत आहे आज उमाच्या घरी जाऊन राज्य शासनाचा आरोग्यरत्न पुरस्कार विजेते डॉक्टर सुरेशजी कांबळे व पंचायत समिती माजी सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते उमाचा कुटुंब सहित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर सुरेश कांबळे यांनी ग्रामीण भागातील मुले आज पुढे जात आहे मुलांचा बुद्ध्यांक वाढ होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुले यशाला गवसनी घालत आहे ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली आहे ती विद्यार्थी मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी अभ्यासाला जात आहे परंतु उमाने घरी राहूनन आपलं ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर यशा ला गवसणी घातली आहे माझ्या कुटुंबाकडून उमाला खूप खूप शुभेच्छा असे मा.सभापती याच्याकडून उमा च्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी तिचे वडील राजेंद्र कोटमे लंकाबाई राजेंद्र कोटमे उपसरपंच नकुल कोटमे उपस्थित होते.