सारे भारतवासी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते त्या क्षणाची पूर्तता झाली आहे. सर्व भारतीयांचे उर अभिमानाने भरून येईल अशी कामगिरी इस्रो ने करून दाखवली आहे. इस्रोने रचला इतिहास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
आज सायंकाळी ठीक ६ वाजता चांद्रयान ३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केली आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. सर्व काही ठरल्या प्रमाणे झाले अशी माहिती इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिली.
चांद्रयान चंद्राच्या पृषठभागावर उतरले तो क्षण.
आता पुढील काही दिवस या यानामधून सोडलेला विक्रम रोवर चंद्राचा अभ्यास करेल आणि सर्व माहिती इस्रो पर्यंत पोहचवण्याच काम करेल.