दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा आता वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. तसेच या परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी विद्यार्थ्यांकडे असणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. हा बदल लक्षात घेऊनच अभ्यासक्रमाची आखणी आगामी शैक्षणिक वर्ष 2024 – 25 साठी करण्यात आली आहे.अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता दोन भाषा सक्तीच्या असणार आहे. त्यातील एक भाषा स्थानिक भारतीय भाषा असणार आहे.